will pankaja munde attend shasan aplya dari program in beed Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : मुंडेंच्या परळीत उद्या शासन आपल्या दारी, खासदारांची असणार अनुपस्थिती, पंकजांच्या भूमिकेकडे बीडवासियांचे लक्ष

मुंडे हजर राहणार ही बाब सर्वत्र चर्चेची विषय बनली आहे.

विनोद जिरे

Beed News :

बीड जिल्ह्यातील परळी शहरात उद्या शासन आपल्या दारी (shasan aplya dari program in beed) या राज्य शासनाच्या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) हजेरी लावणार असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मात्र जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

परळीत शहरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होत आहे. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडेची राहणारी उपस्थिती ही सर्वत्र चर्चेची विषय बनली आहे. दरम्यान आजपासून दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामुळे खासदार डाॅ. मुंडे या दिल्लीत असल्याने त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे भाजपात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील अंतर्गत वाद सर्वश्रुत आहे. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येत असून सर्वात अगोदर ते दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत.

यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील याठिकाणी उपस्थित असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळं आता पंकजा मुंडे या गोपीनाथगड आणि त्यानंतर परळी शहरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT