Sambhajiraje Chhatrapati On Raigad Saam Tv
महाराष्ट्र

Raigad : झुकणार नाही, स्वराज्य निर्माण करणार; रायगडावरुन संभाजीराजेंचा एल्गार

Sambhajiraje Chhatrapati On Raigad : आम्ही कोणासमोर झुकणार नाही आणि आपण आता स्वराज्य निर्माण करायचे आहे असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भुषण शिंदे

रायगड: किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) पार पडला. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या हस्ते आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती राजकीय वक्तव्ये करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र मी आज राजकीय बोलणार नाही असे स्पष्ट करत संभाजी राजे यांनी ऐतिहासिक दाखले देत कोणाचेही थेट नाव घेतले नाही, पण राज्यसभा निवडणूकीवरुन आणि रायगडावरील सोयी-सुविधांवरुन ठाकरे सरकारवर नाव न घेता टीका केली आहे. (Will not bow down, will create Swarajya Elgar of SambhajiRaje Chhatrapati from Raigad)

हे देखील पाहा -

संभाजीराजे छत्रपती आपल्या भाषणात म्हणाले की, आज हा राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना मला सरकारला एकच सवाल विचारायचा आहे कि तुम्ही शिवभक्तांसाठी काय केल? इथे रायगडावर (Raigad) पाण्याची सोय आम्ही केली, इथे बाकी काय हवे नाही ते आम्ही पाहिले. मग तुम्ही काय केलंत? स्वराज्याची सुरुवात याच रायगडावरून केली पाहिजे असा टोलेवजा सल्ला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. त्याचप्रमाणे ते म्हणाले की, मी आज राज्याभिषेक सोहळा असताना या आज कोणतेही राजकीय विधान करणार नाही. अनेकांना वाटले होते की, मी काय बोलेन. पण ही जागा राजकीय विधान करण्यासाठी नाही असं म्हणत त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. (Sambhajiraje Chhatrapati News)

पुढे संभाजीराजे म्हणाले की, मी या रायगड समितीचा अध्यक्ष आहे. मला जर सांगितले की, उद्या राजीनामा दे तर मी लगेच देईन. मला फरक पडत नाही. जेव्हा शिवाजी महाराज यांना मुघल दरबारात अपमानीत केले होते, तेव्हा ते तिथून निघून गेले. आम्ही त्यांचेच वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो अंस म्हणत त्यांनी राज्यसभा निवडणूकीतून माघार घेतल्याबाबत सूचक स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच शिवाजी महाराज यांनी सांगितले होते की, जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे आपण थांबायचं नाही असंही संभाजीराजे म्हणालेत.

संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नाराजीनंतर इतिहासातील किस्सा सांगून नाव ना घेता त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, जेव्हा आदिलशहाने शहाजीराजे यांना पत्र लिहून शिवाजी महाराज यांना आवर घालावा असे सांगितले, तेव्हा शहाजीराजे यांनी पत्र लिहून आदिलशहाला सांगितले की "शिवाजीराजे आमचं ऐकत नाहीत... तुम्हीच काय ते बघावे..." असं म्हणत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. तसेच आम्ही कोणासमोर झुकणार नाही आणि आपण आता स्वराज्य निर्माण करायचे आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असा निर्धारही संभाजीराजेंनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT