Will Krishnaraaj Mahadik Contest the Vidhan Sabha election from Kolhapur Know What Dhananjay Mahadik Said Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur Assembly Election: कोल्हापुरातून कृष्णराज महाडिक विधानसभा लढवणार? धनंजय महाडिकांनी स्पष्ट सांगितलं

Dhananjay Mahadik on Kolhapur Vidhan Sabha Election 2024: काेल्हापूरात सुरु असलेल्या आजच्या बैठका म्हणजे भविष्यातील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे असं म्हणायला हरकत नाही.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

लाेकसभा निवडणुक संपताच कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा वारे वाहू लागल्याचे चित्र आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी शड्डू मारल्याची चर्चा त्यांच्या विधानानं रंगली आहे. धनंजय महाडिक यांनी दस्तुरखूद्द आपले चिरंजीव कृष्णराज महाडिक यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी असल्याचे म्हटले असले तरी पक्ष जाे निर्णय घेईल त्यावर सारं काही ठरले असे खासदार महाडिक यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

कोल्हापूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभव झाला. या पराभवाची करणे शोधण्यासाठी भाजप कार्यालयात नेते मंडळी कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांची आज बैठक घेताहेत. विधानसभा निहाय बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला असता त्यांनी कृष्णराज महाडिक यांचे युवा संघटनाबाबत काैतुक केले.

ते म्हणाले कृष्णराज हे मराठीतले सर्वात लोकप्रिय युट्यबूर आहेत त्यांची लोकप्रियता अफाट आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. याचा आनंद वाटताे. ते युवा आहेत त्यांच्यात ऊर्जा आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्यांना भेटलेले आहेत. त्यांच्या प्रेमाखातर कोल्हापूर शहरात विविध बोर्ड लावण्यात आलेले आहेत. पक्षाने आदेश दिल्यास निश्चित त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात आणले जाईल असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT