Manoj Jarange Patil  Yandex
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'मुंडे, महाजनांना पाडणार', जरांगेंच्या हिटलिस्टवर 113 आमदार

Saam TV News

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत. विधानसभेच्या मैदानात उतरण्याची भाषा करणा-या जरांगेंनी आता आणखी एक नवा निर्धार केलाय. परळीतून धनंजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजनांचा पराभव करणार असल्याचं जाहीर केलय.

लोकसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला. त्यानंतर जरांगेंनी कुणाला पाडायचं आणि कुणाला पाठींबा द्यायचा यासंदर्भात 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच जरांगेंनी त्यांच्या निशाण्यावर असलेल्या काही मतदारसंघांमधल्या मराठा मतादारांचा हिशोब मांडायला सुरूवात केलीय.

जरांगे लढणार, कुणाला नडणार?

आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात 1 लाख 80 हजार मराठा मतं.

जामनेर मतदारसंघात 1 लाख 36 हजार मराठा मतं.

येवला मतदारसंघात 1 लाख 46 हजार मराठा मतं.

परळी मतदारसंघात 1 लाख 14 हजार मराठा मतं असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं.

लोकसभेत 23 उमेदवारांना पाडल्याचा दावा करत आता या आकडेवारीच्या जोरावरच मनोज जरांगे यांनी मुंडे आणि महाजनांसह राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिलाय.

जरांगेंनी आता 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वच पक्षांमधल्या आमदारांचं धाबं दणाणलंय. कारण जरांगेंच्या हिटलिस्टवरील भुजबळ, महाजन, मुंडे हे सर्वश्रृत असले तरी इतर 110 आमदार कोण याचीच आता राज्यभर चर्चा सुरू झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT