Uddhav Thackeray Thane Sabha: लाडकी बहीण, महायुती अन् राम मंदिर; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

Uddhav Thackeray Speech Today: ठाण्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत उद्धव यांनी चौफेर फटकेबाजी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ठाणे महानगरपालिका आणि राम मंदिरावरून मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला लक्ष्य केलं आहे.
लाडकी बहीण, महायुती अन् राम मंदिर; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
Uddhav Thackeray Thane SabhaSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी आज शड्डू ठोकला आहे. ठाण्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत उद्धव यांनी चौफेर फटकेबाजी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ठाणे महानगरपालिका आणि राम मंदिरावरून मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला लक्ष्य केलं आहे.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''आपण केवळ घोषणांचा कार्यक्रम करूया, पण या केवळ घोषणा नाहीत. नुसत्या घोषणा देऊन जिंकता येणार नाही. शिंदे सरकार तेच करत आहेत, नुसत्या घोषणा.'' ते म्हणाले, गेल्या वेळी लबाडी करून जिंकले. ठाणेकरांचं कौतुक करायचं आहे, ५.१५ लाख ठाणेकर निष्ठावंत सोबर आले. कल्याणकरांनी देखील ४.२५ लाख मत दिली.''

लाडकी बहीण, महायुती अन् राम मंदिर; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
Rane Vs Jarange : 'जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना', राणे-जरांगे वाद पेटला; VIDEO

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मुंबईत ४८ मतांनी अमोल किर्तीकर यांची निवडणूक चोरली. पदवीधर आणि शिक्षक आजवर जेवढं कधी मतदान झालं नाही, तेवढं झालं. कोकण देखील माझाच आहे.'' आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, अजून २ महिने आहेत. प्रत्येक गट प्रमुखाने आपली यादी तपासावी.''

'तीन महिन्यात यांचा मित्रपरिवार उघडा करणार'

ठाकरे म्हणाले की, ''ठाणे महापालिका कर्जबाजारी होतेय, कोणी केलं? तीन महिन्यात यांचा मित्रपरिवार उघडा करणार. मुंबई आणि ठाणे महापालिका या शिवसेनेकडेच राहणार. निवडणुका होऊ द्या.''

लाडकी बहीण, महायुती अन् राम मंदिर; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
MNS Video : उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील मेळाव्यात राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पाहा VIDEO

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शिंद बोलले होते, मोदी मोठा प्रकल्प देणार आहेत, कुठे आहे तो प्रकल्प? १५०० रुपयांनी काय होणार आहे, सगळ्यांवर जीएसटी लावला आहे.'' ते म्हणाले, मुसलमान देखील आमच्यासोबत आले आहेत. सगळ्या धर्माचे लोक आमच्या सोबत आले आहेत. सगळे म्हणतात कोरोना काळात केलेल काम आम्ही विसरू शकत नाही. आम्ही गंगेत प्रेत वाहू दिली नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com