Shivsena Mlas Disqualification Case Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, CM शिंदेंसह १६ आमदारांना मिळणार दिलासा? ठाकरेंचं टेन्शन वाढलं!

Shivsena Mlas Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्त्रांकडे पाठविला असल्याची माहिती आहे.

Satish Daud

Shivsena 16 Mlas Disqualification Case

शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाला. आता या प्रकरणाचा निकाल येत्या १० जानेवारीला येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच आमदार अपात्र प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली असली, तरी शिंदे गटालाच दिलासा मिळेल, असेही संकेत मिळत आहेत.

कारण, विधिमंडळातील बहुतमताच्या आधारे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला (Eknath Shinde) दिलं होतं. आता विधानसभा अध्यक्षांनी देखील याच मुद्द्याचा आधार आमदार अपात्रता प्रकरणात घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वात बदल केल्याचा दावा केला होता. या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना दिलासा मिळू शकतो, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्त्रांकडे पाठविला असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या १० जानेवारीला नेमका काय निकाल येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT