Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: पंकजा मुंडेंचं विधीमंडळात कम बॅक, 5 वर्षांत 2 पराभवांनंतर विजयी पताका; मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Government: पंकजा मुंडेंचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाल्यामुळे तब्बल पाच वर्षानंतर त्यांच विधीमंडळाच्या राजकारणात कम बॅम होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यामुळे आता त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहेत.

Vinod Patil

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या विजयाची. पंकजा काही पहिल्यांदा आमदार झाल्या नाहीत. मात्र तरी त्यांच्या विजयाची एवढी चर्चा का रंगलीय? तर त्याला कारणही तसंच आहे. कारण पंकजा मुंडे तब्बल 5 वर्षांनंतर विधीमंडळात प्रवेश करणार आहेत. विजय झाल्यानंतर पंकजांनाही या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करणं टाळता आलं नाही.

पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास?

पंकजा मुंडे 2009 ते 2019 म्हणजे 10 वर्ष परळीच्या आमदार होत्या. मात्र 2019च्या निवडणुकीत त्यांचा त्यांचेच भाऊ धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडेंची थेट राज्याबाहेर रवानगी झाली. त्यांच्याकडे मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांना पाच वर्षांनी थेट बीडमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलं गेलं. मात्र त्यांचा परभव झाला.

महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्यामुळे परळीतून धनंजय मुंडे यांचीच उमेदवारी पक्की असल्यामुळे पंकजा मुंडेंना थेट मतदारसंघ शोधण्यापासून नव्यानं सुरूवात करावी लागते की काय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळेच की काय त्यांच्या लोकसभेतल्या पराभवानंतर बीड जिल्ह्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनं आत्महत्याही केली होती.

मात्र विधानसभेपूर्वीच विधानपरिषदेची निवडणूक लागली आणि पंकजा यांचा पाच वर्षांचा विधीमंडळातला विजनवास अखेर संपला. त्यांची बहिण प्रितम मुंडे यांनाही विजयानंतर अश्रूंना आवरता आलं नाही.

पंकजा मुंडे आता आमदार झाल्या आहेत. आणि याचवेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. लाडकी बहिण योजना राबवणा-या सरकारमध्ये भाजपकडून कोणतीही महिला मंत्रिपदावर नाही. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पंकजा मुंडेंना लगेचच प्रमोशन मिळणार का याबाबत आता उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT