Sangli
Sangli  Saam TV
महाराष्ट्र

Sangli News: सुट्टी नाकारल्याने पत्नीनं झोपून केलेलं आंदोलन राज्यभर गाजलं; आता एसटी प्रशासनाकडून पतीचं निलंबन, कारण...

साम टिव्ही ब्युरो

विजय कदम

सांगली : पतीला सुट्टी दिली नाही म्हणून पत्नीने चक्क एसटी आगारातच आंदोलन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आगार प्रमुखांच्या केबिनसमोर झोपून महिलेने आंदोलन केलं होता. मात्र आता त्या एसटी कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Sangli News)

एसटी चालवत असताना मोबाईलवर संभाषण केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम असे या एसटी चालकाचे नाव आहे.

सांगली आटपाडी येथील एसटी आगारामध्ये विलास कदम एसटी चालक म्हणून गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांनी 12 व 13 मार्च रोजी सुट्टी मिळावी म्हणून अर्ज केला होता. मात्र तो अर्ज वरिष्ठांनी नाकारत सुट्टी देण्यास नकार दिला.

सुट्टी न मिळाल्याने विलास कदम हे ड्युटीवर निघून गेले. मात्र पतीला सुट्टी देत नसल्याच्या कारणातून चालक कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट आटपाडी एसटी आगार प्रमुखांच्या केबिन समोर झोपून आंदोलन केलं होतं. (Latest News Update)

या घटनेनंतर आता एसटी प्रशासनाकडून एसटी चालक कदम यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. एसटी चालवत असताना मोबाईलवर बोलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एसटी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत कदम यांनी रोज सकाळी दहा वाजता एसटी आगारात येऊन हजेरी लावून, कार्यालयीन वेळेत एसटी आगार प्रमुखाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TRP Rating Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला; पहिल्या क्रमाकांवर कोणती मालिका?

Viral News: बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

Sonal Chauhan: बोल्ड सोनलचा सोज्वळ साज; जन्नत गर्लचा 'खास' अंदाज!

CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

SCROLL FOR NEXT