पतीने आत्मदहन करूनही मिळेना न्याय; महिलेचं चक्क स्मशानभुमीतच बेमुदत उपोषण! Saam TV
महाराष्ट्र

पतीने आत्मदहन करूनही मिळेना न्याय; महिलेचं चक्क स्मशानभुमीतच बेमुदत उपोषण!

बीड पासून जवळच असलेल्या पाली येथील, अर्जुन साळुंके यांच्या आजोबांची गावातील सर्वे नंबर 10 मधील जमीन, पाटबंधारे विभागाने संपादित केली होती.

विनोद जिरे

बीड: भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी अनेक वेळा आंदोलनं, ऊपोषण आणि तक्रार देऊनही, न्याय न मिळाल्याने, बीडच्या (Beed) पाली येथील अर्जुन साळुंके यांनी नोव्हेंबर 2020 ला बीडच्या पाटबंधारे कार्यालयाच्या दारातचं, स्वतःला जाळून घेत आपलं जीवन संपवलं होतं. या घटनेला जवळपास आता एक वर्ष 3 महिने होत आले तरी, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळं संतप्त झालेल्या अर्जुन साळुंके यांच्या पत्नीनं, बीडच्या पाली गावातील स्मशानभूमीत बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. (Latest Beed News In Marathi)

बीड पासून जवळच असलेल्या पाली येथील, अर्जुन साळुंके यांच्या आजोबांची गावातील सर्वे नंबर 10 मधील जमीन, पाटबंधारे विभागाने संपादित केली होती. या जमिनीवर प्रशासनाचे सर्व कामकाजही सुरू झाले. परंतु त्याचा मावेजा साळुंके यांना मिळाला नाही. यामुळे साळुंके यांनी अगोदर जिल्हा प्रशासन आणि नंतर मंत्रालयापर्यंत धाव घेतली. परंतु प्रश्न मार्गी न लागल्यामुळे शेवटी 24 नोव्हेंबर 2020 रोजी, त्यांनी बीड शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या दारातचं, जाळून घेत आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी पाठबंधारे भूसंपादन आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र त्यानंतर तरी साळुंखे कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाचा बळी ठरूनही न्याय न मिळाल्याने, आत्मदहन केलेल्या अर्जुन साळुंके यांच्या पत्नीवर देखील न्यायासाठी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे.

दरम्यान संबंधित अधिकारी गुन्हे मागे घ्या म्हणून माझ्यावर दबाव टाकत आहेत. असा आरोप पीडिता तारामती साळुंके यांनी केला आहे. त्यामुळे तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. अशी आर्त हाक तारामती साळुंके यांनी दिली आहे. त्यामुळं सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्मशानभूमीत उपोषण करण्याची वेळ आलेल्या तारामती साळुंके यांना न्याय मिळणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे...!

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe : पालकांनो सकाळी मुलांना घाईगडबडीत द्या पौष्टिक नाश्ता, झटपट बनवा 'पालक पराठा'

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT