अरं बाबवं ! एवढा पैसा, नुसत्या गाड्या जरी विकल्या तरी घेतील अनेक देश विकत

पंतप्रधानांना जगभरातील महागड्या गाड्यांचाही (Brunei prime minister cars) शौक आहे.
Hassanal Bolkiah
Hassanal BolkiahSaam TV

जगभरात श्रीमंतांची कमतरता नाही. श्रीमंत होण्यासोबतच त्यांचे छंदही काही वेगळेच असतात. काहींना महागड्या गाड्या तर काहींना प्रॉपर्टी खरेदीचे शौक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पंतप्रधानाविषयी सांगणार आहोत, ज्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की ते लहान-मोठे देशही सहज खरेदी करू शकतात. या पंतप्रधानांना जगभरातील महागड्या गाड्यांचाही (Brunei prime minister cars) शौक आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे असलेल्या कार कलेक्शनची जगभरात कायम चर्चा होत असते. त्यांच्याकडे एक, दोन, तीन नव्हे तर 2000 गाड्यांचा संग्रह आहे. होय! ब्रुनेईचे सध्याचे पंतप्रधान (Brunei Prime Minister) आणि सुलतान हसनल बोलकिया (Hassanal Bolkiah) यांच्याकडे खूप महागड्या असलेल्या जगातील सर्वोत्तम गाड्यांचा संग्रह आहे. हसनल बोलकिया हे प्रसिद्ध फुटबॉलपटू फैक बोलकिया यांचे नातेवाईक आहेत. फैक हे जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू देखील आहेत. ब्रुनेईच्या पंतप्रधानांची संपत्ती आणि त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊया.

ब्रुनेईचे पंतप्रधान हसनल बोलकिया यांना महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. या गाड्यांच्या किमतीचा अंदाज यावरून लावता येतो की, जगातील अनेक गरीब देशांना त्यांची विक्री करून खरेदी करता येतील. हसनल यांच्या गॅरेजमध्ये चार लाख कोटींहून अधिक किंमतीच्या दोन हजार गाड्या उभ्या आहेत. आणि या काही सामान्य गाड्या नाहीत. गॅरेजमध्ये पार्क केलेली प्रत्येक कार खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला शंभर वेळा विचार करावा लागेल. हसनल बोलकिया यांच्याकडे 600 रोल्स रॉयस, 570 मर्सिडीज बेंझ, 450 फेरारी आणि सुमारे 380 बेंटलेस कार आहेत. याशिवाय इतरही अनेक गाड्या पंतप्रधानांच्या कार कलेक्शनचा भाग आहेत.

हसनल बोलकिया यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे 13 अब्ज युरो म्हणजेच 13 ट्रिलियन 12 अब्ज 13 कोटी 97 लाख 5 हजार 500 रुपये आहे. या मालमत्तेत 4 ट्रिलियन त्यांच्या कारची किंमत आहे. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू फाक बोलकिया हा पंतप्रधानांचा नातेवाईक आहे आणि तो देखील सध्या चर्चेत आहे. ब्रुनेईचे पीएम फाकचे नातेसंबंधात काका लागतात. फैकने त्याचे शालेय शिक्षण इंग्लंडमधून केले आहे आणि ते सध्या ब्रुनेईच्या 19 वर्षाखालील आणि 23 वर्षाखालील फुटबॉल संघात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, फैकचे वडील प्लेबॉय म्हणून ओळखले जातात. ते जगातील सर्वात जास्त कॅश जवळ ठेवणारे व्यक्ती होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com