Devendra Fadnavis On Ethanol Production Saam Tv
महाराष्ट्र

Ethanol Production: ..म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Devendra Fadnavis On Ethanol Production: केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. ज्याचा देशभरातील शेतकरी आणि कारखानदारांनी विरोध केला होता. मात्र आता आपला निर्णय मागे घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis On Ethanol Production:

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. ज्याचा देशभरातील शेतकरी आणि कारखानदारांनी विरोध केला होता. मात्र आता आपला निर्णय मागे घेतला आहे. अशातच केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी का घातली होती? याच्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''साखरेचं उत्पादन यंदा कमी असल्याने ज्यूस टू इथेनॉलवार केंद्र सरकारने बंदी घातली होती. ती मागे घेण्यात आल्याने मोठा फायदा महाराष्ट्र उद्योगाला होणार आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले आहेत की, इथेनॉलच्या संदर्भात केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला होता. त्यासोबत आमची मागणी होती ती केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''केंद्र सरकारने त्याबद्दल फेरविचार केलेला आहे. विषेतः केंद्र सरकारच्या अग्रहावरून उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ज्यूस टू इथेनॉल याच्यामध्ये ही गुंतवणूक केली होती. त्यामुळे अशा प्रकारची बंदी आल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होती. ही गोष्ट खरी आहे.

ते पुढे म्हणाले, यावर्षी साखरेची एकून उत्पादन कमी आहे. म्हणून केंद्राने तो निर्णय घेतला होता. पण त्यात काय अल्टरनेटिव्ह देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते. केंद्र सरकारने बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या उद्योगाचा मोठा फायदा होईल.

याचबाबत माहिती देताना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "केंद्र सरकारने काही सुधारणा करुन इथेनॉल निर्मिती बाबत परिपत्रक काढले आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र अजूनही इथेनॉल निर्मिती बाबत काही सुधारणा व्हायला हव्यात.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Gazette : जरागेंना बळ मिळाले! मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री, कुणबी अन् मराठाबाबत महत्त्वाची नोंद

Maharashtra Live News Update: अकोल्यातील गँगवॉरमधील १७ गुन्हेगारांवर मकोका

Taloda Heavy Rain : तळोदा तालुक्यात अतिवृष्टी; २४ तासांपासून पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

Box Office Collection: बॉलिवूड अन् हॉलिवूडमध्ये काटें की टक्कर; 'बागी 4', 'द बंगाल फाइल्स', 'द कॉन्ज्यूरिंग' कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT