Rahul Gandhi On Parliament Attack
Rahul Gandhi On Parliament AttackSaam Digital

Rahul Gandhi On Parliament Attack: 'बेरोजगारी, महागाईतूनच संसदेत तरुणांची घुसखोरी', राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi On Parliament Attack: संसदेच्या लोकसभा सभागृहात तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर संसदेच्या सुरक्षेवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला आहे.
Published on

Rahul Gandhi On Parliament Attack

संसदेच्या लोकसभा सभागृहात तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर संसदेच्या सुरक्षेवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुरक्षेत त्रुटी राहील्या, कारण देशात बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकार आणि मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाहीत. महागाईने उच्चांक गाठला आहे. या नैराश्येतूनच तरुणांनी संसदेत घुसखोरी केली आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांना सभागृहात चर्चा करायची नाही. ज्या विषयांवर सभागृहात चर्चा करायची असते, ते विषय प्रसारमाध्यमांवर बोलत आहेत. काँग्रेसच्या नावावर मते मागतात, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि राहुल गांधींना टार्गेच करून मतं मागण्याचं काम ते करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Gandhi On Parliament Attack
Court News: धक्कादायक! लैंगिक छळाच्या त्रासामुळे महिला न्यायाधीशांनी मागीतलं इच्छामरण, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

हा संसदीय परंपरेचा अवमान

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी, भाजप आणि केंद्र सरकारकडून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांनवरून लक्ष भटकवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री संसदेतील घटनेवर सभागृहात बोलायला का घाबरत आहेत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या म्हैसूरच्या खासदाराने घुसखोरांना व्हिजिटर पास दिले होते. यावर सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न आपण उपस्थित केला होता. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. संसदेचे अधिवेशन सुरू असताना गंभीर विषयांवर संसदेबाहेर विधाने करता येत नाहीत. मात्र गृहमंत्री अशी विधाने करतात,हा संसदेचा, संसदीय परंपरेचा अवमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi On Parliament Attack
Indian Navy: अरबी समुद्रात मालवाहू जहाज अपहरणाचा प्रयत्न; भारतीय नौदलाने उधळून लावला कट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com