अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या हत्याप्रकरणाताली आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. काल खंडणी प्रकरणात अटक केलेला आरोपी वाल्मीक कराडवरही मकोका लावला गेला. त्याला आज न्यायालयात सादर केले असून या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
खासदार बजरंग सोनावणे यांनी हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. 'संतोष देशमुख यांचे अपहरण करताना वापरली गेलेली स्विफ्ट गाडी कोणाची होती? नंतर त्यांना राहायला घर कोणी दिलं? खंडणीप्रकरणातील आरोपी कोणाच्या घरात होते, त्यांना कोणी गाड्या पुरवल्या हे सगळं समोर येईल', असे वक्तव्य बजरंग सोनावणे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, 'कालपासून बीडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू आहेत, असे असताना आंदोलन कसं झालं? गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळी बंद करण्याचा निर्णय घेतला. मी जर वाल्मीक कराडला धमकी दिली तर इतके दिवस का लागले बोलायला? आमच्या लोकांना मारायचा प्लॅन होतो अशा गुंडांना आम्ही कशी धमकी देणार?'
माध्यमांशी बोलताना त्यांनी 'परळीबाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची प्रवृत्ती झाली आहे. हत्या प्रकरणातील इतर आरोपींनाही मकोका लावायला हवा अशी आमची मागणी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला हवे, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, ते होकार देत नसतील, तर सतीश माने-शिंदे या वकील महोदयांना हे प्रकरण द्यावे', असे विधान केले आहे.
'गुन्हेगाराला कुठलीही जात नसते, काही मूठभर समाजकंटक आहेत, ज्यांना जातीय रंग द्यायचा आहे. अजित दादांनी बीडमध्ये पक्षाची कारवाई करताना थोडा उशीर केला का काय असं वाटतंय. संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात जे जे आहेत जे कोणी सामील असेल या सर्वांना फाशी झाली पाहिजे. मी मागितला तर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का? हा सरकारचा प्रश्न आहे, ते बघतील', असेही बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.