Nanded Politics Saam tv
महाराष्ट्र

Nanded Politics : सेनापती भाजपात, 'सेना' कांग्रेसमध्ये; विधानसभेत नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना कुणाचं आव्हान? पाहा व्हिडिओ

Tanmay Tillu

नांदेड : राज्यात सध्या विधानसभेची निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये. यावेळी खतगावकर यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि मीनल पाटील खतगावकरही स्वगृही परतलेत.

खतगावकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड आणि देगलूर- बिलोली या तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फायदा होऊ शकतो. खतगावकरांच्या घरवापसीमुळे नायगावमधल्या काँग्रेस इच्छुकांच्या आशा धुळीस मिळणार आहेत. कारण मीनल पाटील खतगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. खतगावकरांच्या काँग्रेसमध्ये परतण्यानं नांदेडची जागा काँग्रेससाठी सोयीची ठरणार आहे पाहूया.

नांदेडचं राजकारण बदलणार ?

2019 मध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेस भोकर, नांदेड दक्षिण आणि देगलूर- बिलोली मतदारसंघांत विजयी झाली. तर भोकरमधून स्वतः अशोक चव्हाण विजयी झाले. तर नायगाव, मुखेड मतदारसंघात भाजपचा विजय झाला. यंदा नायगावात भाजपचे राजेश पवार विरुद्ध काँग्रेसच्या मीनल पाटील खतगावकर लढतीची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये मविआचा दणदणीत विजय झाला.

यंदा लोकसभेला काँग्रेसचे वसंतराव चव्हाण नांदेड मधून निवडून आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे अचानक निधन झाले आणि ही जागा रिक्त झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यताय. असं झाल्यास खतगावकरांची घरवापसी आणि दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या सहानुभूतीच्या जोरावर काँग्रेस पक्ष नांदेडचं राजकारण बदलू शकतो. त्यामुळे राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतलेल्या अशोक चव्हाणांचा विधानसभेत महायुतीला विजयी करण्यासाठी राजकीय कस लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भाजप-अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये खडाजंगी; महायुतीत वादाची ठिणगी?

Viral Video: तुम्ही खाताय सापाने चावलेल्या भाज्या? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

OBC-मराठा समाजाला लढवणार निवडणुका जिंकणार? ओबीसी आंदोलनावरुन जरांगे संतप्त

Fact Check : साताऱ्यातील कास पठारावर फिरतेय सिंहांची टोळी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Numerology Number 7 : पैसे मिळवण्याची कला, स्वतंत्र वृत्ती; ७,१६,२५ तारखेला जन्मलेले व्यक्ती कसे असतात? वाचा भाग्यांक

SCROLL FOR NEXT