IPS officer Anjana Krishna in spotlight after her viral phone call with Deputy CM Ajit Pawar. saam tv
महाराष्ट्र

Who Is IPS Anjana Krishna: महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

Who Is IPS Anjana Krishna: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल फोन संभाषणामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. आयपीएस अंजना कृष्णा या कोण आहेत हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • सोलापूरच्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि अजित पवार यांचा फोन कॉल व्हायरल.

  • संभाषणात दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची चर्चा.

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरच्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या फोनवरील संभाषणात आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यात जोरदार वाद झाला. यावरून राजकारण तापलंय. (IPS Anjana Krishna In Spotlight After Viral Clash With Deputy CM Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिकारी महिलेनं ओळखलं नव्हतं. त्यानंतर अजित पवार हे त्यांच्यावर कमालीचे संतापले होते. दरम्यान यासर्व प्रकरणावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आपला उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता. तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी. ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.

पोलीस दलाबद्दल तसेच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर असल्याचं अजित पवार म्हणालेत. दरम्यान अजित पवार यांना न ओळखणारी महिला अधिकारी नेमकी कोण असा प्रश्न अनेक विचारत आहेत. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण हे जाणून घेऊ.

who is ips Anjana Krishna: अंजना कृष्णा कोण आहे?

IPS अंजना कृष्णा यांचे नाव अंजना कृष्णा व्हीएस आहे. त्या २०२३ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्या सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून तैनात आहेत. तिच्या प्रामाणिकपणा आणि डेअरिंगबाज शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंजनाने २०२२-२३ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत एआयआर-३५५ मिळवले होते.

अंजना यांचा जन्म केरळ राज्यातील तिरुअनंतपुरमध्ये झालाय. त्या मलयंकीजू येथील राहणाऱ्या असून त्या साधारण कुटुंबात येतात. त्यांचे वडील बीजू कपड्यांचे व्यापारी आहेत. तर आई सीना कोर्टात टायपिस्टचं काम करतात. अंजना यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट मॅरीज सेंट्रल स्कूल पूजप्पुरा येथे झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT