CJP founder Abhijeet Deepke addresses the media after the Jantar Mantar protest, 
महाराष्ट्र

Cockroach Janata Party: सरकारला प्रश्न विचारणारे पाकिस्तानी आहेत का? अभिजीत दीपके यांचा सवाल

Cockroach Janata Party: सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आहे. सरकारला प्रश्न विचारलं की सरकार त्यांना पाकिस्तानी म्हणते असेही दीपके म्हणालेत.

Bharat Jadhav

  • अभिजीत दीपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली

  • सात दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र

प्रश्न विचारणारे पाकिस्तानी आहेत का? विरोधकांना पाकिस्तान म्हटलं जातं, युवकांना तेच म्हटलं जात मग कोण भारतीय कोण आहे? असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला. दिल्लीमधील जंतर-मंतरवर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीगरमध्ये आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी पु्न्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जर सात दिवसाच्या कालावधीत सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर आंदोलन अजून तीव्र केलं जाईल. सरकार नेपाळ आणि बांगला देशातील आंदोलनासाठी आमच्या आंदोलनाची तुलना केली जातेय, ते चुकीचं असल्याचं म्हटलंय.

पुढची दिशा काय असणार?

दिल्लीमधील जंतर-मंतरवरील आंदोलन केल्यानंतर कॉकरोचजनता पार्टी पुढे काय करणार हा प्लॅनदेखील आज अभिजीत दीपके यांनी सांगितला. आता परत अमेरिकेत जायचे नसून आता भारतात राहणार आहे. देशातील तरुणांचे मुद्दे कॉकरोज जनता पार्टी उचलणार आहे. मग ते युवा शेतकरी असो, विद्यार्थी असो, या सर्वांचे प्रश्न मुद्दे उचलणार आहे. आपल्या आंदोनलाविषयी बोलताना दीपके म्हणाले की, देशात जे चालू आहे ते सर्व राजकीय आहे. प्रश्न विचारणं हे राजकीय असतं. राजकारण म्हणजे मत देणं इतपर्यंत नसतं.

कोणत्या पक्षासोबत युती करणार का?

कॉकरोच पार्टी कोणासोबत युती करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अभिजीत दीपके म्हणाले की, जे देशातील युवा आहेत, जे झेन जी आहेत, ते सर्व राजकीय पक्षांना कंटाळले आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्या पक्षाशी युती किंवा त्यांच्या सोबत भागीदारी करणार नाहीत. ज्यांना युवकांची काळजी आहे , ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. परंतु आम्ही कोणाशी युती करणार नाहीत.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सरकार चूक स्वीकारत नाही. राजीनामा घेत न घेता बदल झाल्याचं म्हणते. परंतु थोडा बदल करावा लागेल. सरकार कायम हिंदू -मुस्लीम वाद उभ करते, परंतु हिंदू मुस्लीम केल्यानं नोकरी मिळणार नाही. देशात बेरोजगारी वाढतेय. सरकार आपले काम व्यवस्थित करत नसल्यानं आम्हाला आंदोलन करावं लागत असल्याचं दीपके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT