Faheem Khan the mastermind behind the Nagpur riots Saam Tv News
महाराष्ट्र

मास्टरमाईंडला बेड्या; कोण आहे नागपूर दंगलीचा प्लॅनर? कसा रचला दंगलीचा प्लॅन?

Nagpur Riots Marathi News : जाळपोळीच्या घटनांमुळे नागपूर हादरलं. यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत दंगलखोरांना जेरबंद केलं. तर या दंगलीचा एफआयआर साम टीव्हीच्या हाती लागलाय.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टीव्ही

नागपूर : नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र हा मास्टरमाईंड नेमका कोण आहे? या मास्टरमाईंडने दंगलीचा प्लॅन कसा केला? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

जाळपोळीच्या घटनांमुळे नागपूर हादरलं. यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत दंगलखोरांना जेरबंद केलं. तर या दंगलीचा एफआयआर साम टीव्हीच्या हाती लागलाय. यात ३८ वर्षीय फहीम खान नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलंय. मात्र दंगलखोर फहीम खान नेमका कोण आहे? पाहूयात.

कोण आहे फहीम खान?

मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष

वय वर्ष ३८

दहावीपर्यंत शिक्षण

फहीम खानचा लोकसभा निवडणुकीत पराभव

चिथावणीखोर भाषणातून दंगल भडकवल्याचा आरोप

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केलं. या आंदोलनानंतर अडीचशेपेक्षा जास्त लोकांना एकत्र करत भडकाऊ भाषण करत हिंसाचार घडवल्याचा आरोप फहीम खानवर आहे. त्याने बजरंग दलाच्या आंदोलनावेळी पीर दर्ग्यावरची मुस्लिम आयतं असलेली चादर जाळण्यात आल्याचा दावा करत चिथावणी दिली आणि हिंसाचार उसळल्याचं म्हटलंय. तर फहीम खानला साथ देणाऱ्या 51 दंगलखोरांना जेरबंद केलंय. तर 10 टीम उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम शमीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. आता पुढील तपासात आणखी गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. मात्र फहीम खानच दंगलीचा मास्टरमाईंड आहे की दंगलीमागे फहीम खानचाही आका आहे? याची कसून चौकशी व्हायला हवी. एवढंच नाही तर लोकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या दंगलखोरांवर कायमची जरब बसवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT