CJI Dhananjaya y. chandrachud
CJI Dhananjaya y. chandrachud  Saam Tv
महाराष्ट्र

Who Is Cji Chandrachud: सत्तासंघर्षावर सुनावणी करणारे सरन्यायाधीश चंद्रचूड कोण आहेत? जाणून घ्या

Satish Kengar

Who Is Cji Chandrachud: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या आपला निकाल जाहीर करू शकतात. हा निकाल फक्त शिवसेनेसाठी महत्वाचा नाही तर या निकालाच्या भविष्यातील राजकारणावर देखील प्रभाव पडणार आहे.

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, ते उद्या दोन प्रकरणांमध्ये निकाल देणार आहेत. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरण तसेच दुसरे प्रकरण दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वादाशी संबंधित आहे. यातच आपण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश धनंजय वाय चंद्रचूड यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना देशाचे ५० वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ दिली. (Latest Marathi News)

Dhananjaya Y Chandrachud : धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे वडीलही होते सरन्यायाधीश

न्यायमूर्ती चंद्रचूड याचे वडील देखील जवळपास सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश होते. हा सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सरन्यायाधीश म्हणून सर्वात मोठा कार्यकाळ होता. २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत ते सरन्यायाधीश होते.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचे शिक्षण

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि त्यांची आई प्रभा शास्त्रीय संगीतकार आहेत. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले. त्यानंतर अमेरिकेच्या हार्वर्ड लॉ स्कूलमधून न्यायशास्त्रात एलएलएम आणि डॉक्टरेट मिळवली.

न्यायमूर्ती चंद्रचूड हे अनेक घटनापीठांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग राहिले आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. यामध्ये अयोध्या जमीन वाद, आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेची वैधता, सबरीमाला प्रकरण, लष्करातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन, भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन सारख्या निर्णयांचा समावेश आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड हे २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पदावर असतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची तयारी पूर्ण; शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Shocking Viral Video: माता न तू वैरिणी! चिमुकलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

Salt Side Effects : थांबा थांबा! तुम्हीही जास्त मीठ असलेलं जेवण खाताय? आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचा

Pimpari Chinchwad News: 'भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा', पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर; अज्ञातांनी लावले बॅनर

Uddhav Thackeray News: नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT