Samruddhi Mahamarg Saam TV
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या नावातून बाळासाहेबांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळणारे झारीतले शुक्राचार्य कोण? आमदार चेतन तुपेंचा सवाल

महामार्गाचे संपूर्ण नाव अगदी गुगल सर्च इंजिन, गुगल मॅप यावरही संपूर्ण नाव दिसत नाही.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : समृद्धी महामार्गाचे खरे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे आहे. हे नाव अधिकृतपणे सर्वत्र यायला हवे. मात्र या महामार्गाचा उल्लेख फक्त समृद्धी महामार्ग असाच होत असताना दिसून येत आहे. हा प्रकार मुद्दाम होतो आहे का? बाळासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात येते आहे का अशी स्पष्ट विचारणा हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी विधानसभेत केली. (Latest Marathi News)

महामार्गाचे संपूर्ण नाव अगदी गुगल सर्च इंजिन, गुगल मॅप यावरही संपूर्ण नाव दिसत नाही. हे जाणूनबजून करण्यात येते आहे का असा सवाल अंतिम आठवडा प्रस्ताव यावर विधानसभेत बोलतांना त्यांनी केला. सर्च इंजिन आणि गुगल मॅपवर संपूर्ण नाव का नाही ?

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असा उल्लेख टाळणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत जे जाणीवपूर्वक बाळासाहेबांचे नाव येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत याची दखल घ्यावी तातडीने कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

या महामार्गावर होणारे वाढते अपघात देखील चिंताजनक असल्याचे सांगून हा महामार्ग भाग्यरेषा आहे असे म्हणतात परंतु यावर काहींच्या जीवनरेषा कायमच्या संपल्या अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मदतीअभावी रुग्णवाहिकेची वाट पाहत दीड दोन तास अपघात ग्रस्तांना थांबावे लागते. वेळेवर सेवा उपलब्ध होत नाही. याची तातडीने दखल घ्यावी अशी विनंतीही त्यांनी सभागृहात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा मोठा निर्णय! भाजपसोबत युती नाही

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT