Jalgaon News: दारू पिणाऱ्यांवर थर्टी फस्‍टच्‍या रात्री भरारी पथकाची नजर; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १३२७ गुन्‍हे

दारू पिणाऱ्यांवर थर्टी फस्‍टच्‍या रात्री भरारी पथकाची नजर; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १३२७ गुन्‍हे
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील एप्रिल २२ ते २७ डिसेंबर २०२२ अखेर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी गुन्ह्यांतर्गत १३२७ गुन्हे उघडकीस आणून ७८५ आरोपींना अटक केली आहे. ७६ वाहने जप्त करून २ कोटी ४३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सराईत गुन्हेगार यांचे विरोधात कलम ९३ नुसार प्रांताधिकारी यांचेकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. (Letest Marathi News)

Jalgaon News
Dhule News: भीमा कोरेगाव शौर्य दिनाबाबत वादग्रस्त विधानाचे धुळ्यात पडसाद

विभागाने रुईखेडा (ता. मुक्ताईनगर) व पारोळा येथील बनावट देशी मद्य कारखाना, वाहतूक या मोठ्या कारवाईचा समावेश आहे. बनावट मद्य, अवैध मद्य विक्रीतून शासनाच्या महसूलाचे तर नुकसान होतेच त्याबरोबरच मानवी सेवानास आरोग्यास धोकादायक होते. अवैध मद्य विक्री धाबे, खानावळ ४ जागा मालक व ३३ मद्यपी यांचे विरोधात महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यान्वये कारवाई करून तात्काळ आरोपपत्र दाखल करून प्रथम न्यायदंडाधिकारी (Bhusawal) भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, जळगाव, पाचोरा यांनी ९२ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा केली आहे.

नववर्षाच्‍या रात्री दोन भरारी पथक

नाताळ व नूतन वर्षाभिनंदन २४, २५ व ३१ डिसेंबर २०२२ गृह विभागाच्‍या आदेशानुसार अबकारी आस्थापना दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत सुरू राहतील. याचे नियंत्रणाकरिता ९ दुय्यम निरीक्षक त्यांचे कार्यक्षेत्रात व जिल्ह्यामध्ये २ भरारी पथके कार्यरत आहेत. परराज्यातील मद्य नियंत्रण करीता सीमावर्ती भागात पूर्ण वेळ विभागाचे सीमा तपासणी नाक्यावर पुर्नाड मुक्ताईनगर व चोरवड, रावेर, यावल, मुक्ताईनगर येथे एक पथक कार्यरत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com