Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Dussehra Special : महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, नेमकी प्रथा आहे तरी काय? पाहा व्हिडिओ

Maharashtra News : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची ३५० वर्षांपासून पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी गावकरी रावण आराधनेत सहभागी होतात. या परंपरेमुळे रावण मंदिर पाहण्यासाठी पर्यटकही आकर्षित होतात.

Alisha Khedekar

  • अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणपूजेची ३५० वर्ष जुनी परंपरा आहे.

  • गावाच्या प्रवेशद्वारावरच सुंदर रावण मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

  • दसऱ्याला रावण दहनाऐवजी येथे पूजा केली जाते

  • रावण मंदिर पाहण्यासाठी पर्यटक आणि भक्त श्रद्धेने येतात

'रावण' हा रामायणातील 'व्हिलन', आणि खलपुरूष अशीच या पात्राची सर्वांच्या मनात प्रतिमा आहे. सितेचं अपहरण करणाऱ्या रावणाभोवतीच रामायणाचं मध्यांतर आणि क्लायमॅक्सही फिरतो. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दसऱ्याला दहन केल्या जातं. मात्र, अकोला जिल्ह्यातील एका गावात चक्क याच रावणाची पुजा केली जाते. हे रावणपुजक गाव कोणतं आहे? साडेतीनशे वर्षांची या गावाची रावणमुर्ती पुजेची परंपरा नेमके आहे तरी काय? पाहूयात.

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात ५० किलोमीटरवर असलेलं पातूर तालूक्यातील 'सांगोळा'. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. सुमारे ३५० वर्षांची परंपरा या मूर्तीच्या आगमनाची आहे. या गावात रावणाच्या मंदिरासोबत राम, हनुमान आणि इतर देवतांची मंदिरंही आहेत.

या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचाही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. दसऱ्याच्या दिवशी संपुर्ण गाव रावणाच्या आराधनेत रंगून जातं.

दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच खरे राक्षस आहेत. दरम्यान आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी निमित्त समाजातील राक्षसी वृत्तीचा नायनाट करून शुभ सुरुवात करूया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: संगमनेरमधील मुस्लिम मावळा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Swollen Face: सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला का दिसतो?

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT