E sakal No.1 Marathi Site Saam Tv
महाराष्ट्र

E sakal No.1 Marathi Site: ई सकाळचा पुन्हा डंका; साडे सहा कोटी वाचकांनी बनवलं महाराष्ट्रातील नंबर १ न्यूज प्लॅटफॉर्म

Maharashtra's No.1 Marathi News Site: कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार ई सकाळने महाराष्ट्रातील नंबर १ डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून पुन्हा अव्वल स्थान मिळवलं आहे. तब्बल ६५.५ मिलियन युनिक व्हिजिटर्ससह वाचकांनी ई सकाळवर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मराठी डिजिटल माध्यमांच्या विश्वात पुन्हा एकदा ई सकाळने आपली मजबूत पकड सिद्ध केलीये. कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार, ई सकाळ या डिजिटल प्लॅटफॉर्मने महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवलंय. वाचकांनी पुन्हा एकदा ई सकाळवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणावर या वेबसाइटला पसंती दिलीये. त्यामुळे सर्वाधिक लोकांनी ई सकाळच्या संकेतस्थळावर भेट देत विविध बातम्या वाचल्या आहेत.

ई सकाळने नेहमीच विश्वासार्ह आणि वाचकांच्या उपयोगाच्या बातम्या देण्यावर भर दिला आहे. वाचकांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील अशा माहितीपूर्ण बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला. याच विश्वासाच्या जोरावर ई सकाळने पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रातील नंबर १ डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याचं सिद्ध केलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कॉमस्कोरच्या क्रमवारीत ई सकाळ सातत्याने पहिल्या स्थानावर कायम आहे.

ई-सकाळची उल्लेखनीय कामगिरी

कॉमस्कोरच्या रिपोर्टनुसार, ई सकाळच्या वेबसाइटला तब्बल ६.५ कोटी म्हणजेच ६५.५ मिलियन युनिक व्हिजिटर्स मिळाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने वाचकांनी ई सकाळवरील बातम्यांना पसंती दिली आहे. पारंपरिक सकाळ वृत्तपत्रापासून डिजिटल माध्यमातील ई सकाळपर्यंतचा हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी मानला जात आहे.

वाचकांचा कायम असलेला विश्वास

ई सकाळने सुरुवातीपासूनच विश्वासार्ह पत्रकारितेला प्राधान्य दिलं आहे. अचूक, स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ई सकाळ सातत्याने करत आहे. याच प्रामाणिक कामामुळे वाचकांनीही ई सकाळवर नेहमीच विश्वास ठेवला आहे. त्यामुळेच ई सकाळ महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि नंबर १ डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून पुढे आला आहे.

ई सकाळच्या या यशामध्ये साम टीव्ही आणि सरकारनामा या प्लॅटफॉर्मचंही महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. या दोन्ही माध्यमांनीही वाचकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेत उपयुक्त बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे वाचकांचा विश्वास अधिक मजबूत झाला आणि ई सकाळच्या डिजिटल प्रवासाला मोठं बळ मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT