Ladki Bahin Yojana yandex
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला पुढचा हफ्ता कधी मिळणार? शपथविधी सोहळ्यात होऊ शकते मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: शपथविधी सोहळ्यात लाडक्या बहिणीचा पुढील हफ्ता कधी मिळणार याची घोषणा होऊ शकते.

Dhanshri Shintre

महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर जुलैपासून या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत. आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण ही योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता.

महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. त्यातच काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, शपथविधी झाल्यानंतर लाडक्या बहिणीचा पुढील हफ्ता कधी मिळणार याची घोषणा होऊ शकते.

या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशांवरून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्यानं या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलंच तापलं होतं.

त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती.

दरम्यान पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल, निवडणुकीसाठीच ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता, याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT