Vanshawal (family tree document) is a key requirement for caste certificate applications in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

What Is Vanshawal Family Tree : महाराष्ट्रात जात प्रमाणपत्रासाठी वंशावळ आवश्यक असते. वंशावळला इंग्रजीत फॅमिली ट्री म्हटलं जातं. हे कागदपत्र का महत्त्वाचे आहे आणि ते कसे मिळवायचे हे टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ दाखला महत्त्वाचा कागदपत्र आहे.

  • वंशावळ म्हणजे कुटुंबाच्या पूर्वजांचा आणि पिढ्यांचा इतिहास.

  • हा दाखला स्थानिक महसूल कार्यालयातून अर्ज करून मिळवता येतो.

  • कुणबी किंवा ओबीसी प्रमाणपत्रासाठी वंशावळची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र काढण्यास रांग लागलीय. कुणबी प्रमाणपत्र किंवा जातीचं प्रमाणपत्र मिळवायचे असेल अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या कागदपत्रांमध्ये वंशावळ दाखला देखील लागत असतो. जर वंशावळचा दाखल नसला तर जातीचं प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होतात.

पण आपल्यातील अनेकांना वंशावळ म्हणजे काय, ते कसं मिळवायचं असा प्रश्न पडला असेल. आपण आज दोन्ही प्रश्नांचे उत्तर या लेखातून जाऊन घेऊ. वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती यात नमूद केलेली असते. आपल्या आधीच्या पिढीतील पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतची माहिती नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलं असते. त्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात. तर इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.

वंशावळ कशी काढतात?

जर तुम्हाला वंशावळ काढण्याची असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीमधील व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं लिहावी लागतील. जसे की, आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमाने लिहा.

तर ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते. याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळत असतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते, त्यात कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळत असतो. तसेच जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळत असतो. आजोबा शिकलेले असतील आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथेही नोंद आढळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT