Maratha-Kunbi caste certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

How to Get Kunbi OBC Certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या. या प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे जाणून घ्या.
How to Get Kunbi OBC Certificate
Distribution of Maratha-Kunbi caste certificate in Maharashtra — complete guide for application process.saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र शासनाने नवीन जीआर नुसार मराठा-कुणबी प्रमाणपत्र वितरणाला सुरुवात केली.

  • लातूर जिल्ह्यात दोन जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं.

  • अर्जासाठी आधार, शाळा दाखला, जमीन उतारे यासारखी कागदपत्रं आवश्यक आहेत.

राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या नवीन जीआर नुसार लातुरातील दोन जणांना आज कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तुम्हालाही ओबीसी प्रमाणपत्र काढायचे असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. आम्ही प्रमाणपत्र कसं मिळवायचं याची सर्व माहिती यात देत आहोत.

How to Get Kunbi OBC Certificate
Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

अशी आहे प्रक्रिया

अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे करा.

तुमचा अर्जाची पडताळणीसाठी स्थानिक समितीकडे पाठवला जाईल.

या समितीकडून वंशावळ तपासणी केली जाईल.

त्याचबरोबर जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासण्यात येतील.

चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतील.

How to Get Kunbi OBC Certificate
Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

आवश्यक कागदपत्रे Maratha Kunbi caste certificate Documents

अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे गरजेचं आहे.

वरील पुरावा उपलब्ध नसल्यास अर्जदाराने १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.

अर्जदाराच्या गावातील किंवा कुळातील नातेसंबंधात व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडावे.

अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे ( यात जुने कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इत्यादी.) जोडता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com