Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime News: मोमोज खायला निघाल्या, वाटेत दोघांनी मायलेकांना छेडलं; नागरिकांकडून तरुणांची धुलाई

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाळूज बजाजनगरच्या गोरख वाघ चौकात मध्यरात्री चार रोडरोमियोंकडून छेडछाडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वाळूज बजाजनगरमधील गोरख वाघ चौकात मध्यरात्री घडलेल्या एका घटनेने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. आईसोबत मोमोज खाण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा चार रोडरोमिओंनी पाठलाग करून छेड काढली. या असभ्य प्रकाराने घाबरलेल्या मुलीने व तिच्या आईने आरडाओरड केली.

या आवाजामुळे स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले व त्यांना प्रकार समजताच चौघा रोडरोमियोंना जमावाने चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना जवळच्या दुकानात कोंडून ठेवण्यात आले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

वर्दळीच्या ठिकाणीही महिलांना अशा प्रकारच्या छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महिला सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजनांची मागणी केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ या घटनेपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस धारकांना फटका

Edible Oil Price Hike: युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरात उडाला भडका, खाद्यतेलाच्या किंमतीत १२५ रुपयांनी वाढ

Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

SCROLL FOR NEXT