Nashik Rain
Nashik Rain Saam Tv
महाराष्ट्र

Weather Updates : नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; पहिले ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

अभिजीत सोनावणे

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नाशिक शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Nashik Rain News)

नाशिकमध्ये अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा देखील देण्यात आला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाची संततधार सुरूच आहे. सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नार-पार, अंबिका, वाझडी, तान-मान, कावेरी पिंजाळ, दमणगंगा या नद्या तर धोक्याच्या पातळी जवळ पोहचल्या असून पाऊस असाच सुरू राहीला तर या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडतील. (Nashik Latest News)

दुसरीकडे पुराच्या पाण्यामुळे छोटे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिंपळसोंड, खुंटविहीर, शिराळा, अळीवपाडा, उंबरवाडा, दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, वाघाडी, आमदा, वांगण, वाजवड, उंबुरणे, मंनखेड आदी गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT