Maharashtra Rain Alert  SAAM TV
महाराष्ट्र

Weather Update : परतीच्या पावसाची चाल थबकली, महाराष्ट्रात पुन्हा पडणार जोरदार पाऊस; आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट

IMD Maharashtra Rain Alert : परतीच्या पावसाचा कहर नेमका कधी थांबणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Satish Daud

मान्सूनने परतीची वाटचाल सुरु केल्यानंतर गेल्या ४ दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धरणे काठोपाठ भरली आहे. दुसरीकडे शेतीपिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा कहर नेमका कधी थांबणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

आयएडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारपासून राज्यात सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह, मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

सध्या मध्यप्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे दक्षिण गुजरातपासून वायव्य बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

आज या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात पावसाची शक्यता

मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही अधून मधून पावसाच्या सरी कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून उघडीप मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नैऋत्य मौसमी परतीचा पाऊस मंगळवारी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून परतला.

मात्र, त्यानंतर मान्सूनची वाटचाल थबकली असून फिरोजपूर, सिरसा, अजमेर, चुरू, दीसा, सुरेंद्रनगर, अजमेर ते जुनागडपर्यंत परतीची सीमा कायम आहे. या भागातून मान्सून परतला नसल्याने पुढील चार ते पाच दिवस आणखी काही राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT