Weather Forecast 29 February 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

Weather Forecast 29 February 2024

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावी, असा सल्लाही भारतीय हवामान खात्याने दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या तीन ते चार दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

आता नव्याने ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रीय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशातच अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.

राज्यात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित अवकाळी पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकणातील काही जिल्ह्यांतही अवकाळी पाऊस होऊ शकतो. असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT