Maharashtra Weather Update Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : विदर्भ-मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून तब्बल 6 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Alert Today : हवामान विभागाने आज सोमवारी विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी केला आहे.

Satish Daud

जुलै महिन्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काहीशी विश्रांती घेतली. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी अजूनही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. हवामान विभागाने आज सोमवारी विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भात (Vidarbha Rain Alert) तुरळक ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या ईशान्य राजस्थान आणि परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. मान्सूनचा आस ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे.

त्यामुळे आज सोमवारी महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. दरम्यान, रविवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या होत्या. रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील शेतीकामांचा खोळंबा झाला होता.

महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?

हवामान खात्याने विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT