Rain News Today 3 October 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : दसऱ्याच्या दिवशीच राज्यात कोसळणार तुफान पाऊस; मराठवाडा-विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Updates : आज जालना, बीड विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात तुफान पावसाची शक्यता आहे.

Satish Daud

सलग दोन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज शनिवार (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई पुण्यासह घाटमाथ्यावर देखील विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मौसमी वाऱ्यांची चाल थबकली. त्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ३५ अंशाचा पार गेला. उन्हाच्या झळा बसत असल्याने प्रचंड उकाडा जाणवू लागला.

मात्र, मौसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच आज दसऱ्याच्या दिवशी पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट आहे.

दुसरीकडे जालना, बीड विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूरमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT