weather update saam tv
महाराष्ट्र

Weather Update: पुण्यात हुडहुडी, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रही गारठला, निफाडचा पारा निच्चांकी 4.5 अंशावर

पुण्यात थंडीची हुडहुडी कायम आहे. पुढील चार दिवस गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अश्‍विनी जाधव केदारी, अभिजीत सोनावणे

Weather Update: पुणे: पुण्यात थंडीची हुडहुडी कायम आहे. पुढील चार दिवस गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान आणि थंड वाऱ्यामुळे शहर आणि परिसरात गारठा जाणवत आहे (Weather Update Temperature Drop In Pune And Nashik).

पुढील 2 दिवस पहाटे धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काल पुण्यात (Pune) तापमानाचा पारा खाली घसरुन 10 अंशावर आला होता.

नाशकातही थंडीची लाट

नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. निफाडमध्ये (Niphad) थंडीचा पारा आणखी घसरला आहे. निफाडमध्ये हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीये. कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना हुडहुडी भरली आहे.

नाशिकमध्येही तापमानाचा पारा (Temperature) घसरला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. नाशिकमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT