World Meteorological Organization forecast – Monsoon in India is likely to be weak this year due to the influence of El Nino saam tv
महाराष्ट्र

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

WMO Monsoon Prediction: जागतिक हवामान संघटनेने मान्सून पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. अंदाजानुसार यंदा मान्सूनवर एल निनोचा परिणाम जाण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे दुष्काळाचा धोका वाढू शकतो.

Bharat Jadhav

  • जागतिक हवामान संघटनेने भारतातील मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर केला.

  • यावर्षी अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त.

  • पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास दुष्काळाचा धोका वाढू शकतो.

भारतामधील शेती ही प्रमुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जर कधी अतिवृष्टी झाली तर पिकांना फटका बसतो, तर कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळाचा सामना करावा लागतो. गेल्यावर्षी देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता. काही राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला.

अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज समोर आला आहे. जागतिक हवामान संघटनेकडून मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतातील मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर या संघटनेचा अंदाज खरा ठरला तर यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रातही यावेळी अल नीनोचा प्रभाव पहायला मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यातही पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षी राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच जाणवणार आहे. यावर्षी तापमानात मोठी वाढ होईल, असाही अंदाज जागतिक हवामान संघटनेने वर्तवला आहे. दरम्यान काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी अल नीनोच्या प्रभाबाबत कोणताही अंदाज वर्तवणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र देशात पावसाची परिस्थिती काय असणार? अल नीनोचा देशातील पावसाला कितपत फटका बसणार? याचे चित्र मे नंतरच स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे सध्या चिंता करण्याचं कारण नाही.

गुजरातमधील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर विपरित परिणाम

राज्यभरात उन्हाची धग जाणवू लागली आहे. कमाल तापमानाचा पारा 36 ते 40 अंशांच्या दरम्यान आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दुसरीकडे विदर्भासह मराठवाड्यात शुष्क व कोरडी हवा राहणार आहे. मुंबईत मंगळवारी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. काही हवामान तज्ज्ञांच्या मते, आज, बुधवार 11 मार्चपासून मुंबईत तापमान कमी होईल आणि काही प्रमाणात दिलासा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT