Weather Update 6 March 2024 Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा; येत्या २४ तासांत कुठे कुठे कोसळणार पाऊस?

Weather Forecast Today: पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गाटपीट होण्याची देखील शक्यता आहे.

Satish Daud

Weather Update Today in Marathi

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसासोबत गारपीट झाल्याने फळबागांसह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गाटपीट होण्याची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. (Latest Marathi News)

भारतीय हवामान विभागाने बुधवारी (ता. ६) महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने ईशान्येकडील राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, आज पूर्व आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे. ६ मार्च आणि ७ मार्चच्या रात्री पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी पाहायला मिळेल. दिल्लीत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाजही हवामान कात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: 500 रुपयांची नोट बंद होणार? ATMमध्ये 100-200 च्याच नोटा मिळणार? काय आहे सत्य, जाणून घ्या

नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाने गोळी झाडून आयुष्य संपवलं, मेहुण्याने जे सांगितलं ते वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Kunbi Maratha : सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

SCROLL FOR NEXT