Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : ५ दिवस महत्वाचे! विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस झोडपणार; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात विविध ठिकाणी पुढील ५ दिवस विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस कोससळणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

काल सकाळपासून राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात विविध शहरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. पावसाचा जोर आजही काही ठिकाणी कायम असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यातील हवामानाचा अंदाज काय आहे याची माहिती जाणून घेऊ.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या आवर्तनात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे कृष्णा, कोयना आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर देखील येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अति वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती बदलानुसार, सोमवारपासून मान्सून राजस्थान कच्छमधून परतण्यास सुरवात झाली आहे.

पुढील पाच दिवस विजांचा कडकडाट

सप्टेंबरच्या २३ ते २७ तारखे दरम्यान म्हणजे आजपासून पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजा आणि गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

या जिलह्यांत कोसळणार अतिजोरदार पाऊस

अतिजोरदार परतीच्या पावसाची तीव्रता खान्देश, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात असणार आहे. तर गुरुवार २६ सप्टेंबरला मुंबई, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकामांचे नियोजन

मंगळवार ते गुरुवार (२४, २६ सप्टेंबर) शेतपिके काढणी आणि शेत मशागतीला पावसामुळे अडचणी निर्माण येऊ शकतात. शेतकऱ्यांनी शेतकामाचे नियोजन त्याप्रमाणे करावे. २८ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

SCROLL FOR NEXT