धुळे : धुळे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले असून आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी व मजुरांना देखील परत यावे लागले.
धुळे (Dhule) शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाळा सुरवात झाली. यानंतर पावसाची संततधार सुरु असून आज दुपारी बारा वाजेनंतर पावसाचा जोर वाढला असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू होती आणि आज दुपारनंतर पुन्हा (Heavy Rain) पावसाला सुरुवात झाली आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे शेती पिकाला मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच जलसाठ्यांमधील देखील पाण्यात वाढ होणार असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.