ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या रोजच्या जीवनात अनेक नागरिक पांढऱ्या केसांमुळे हैराण झाले आहेत.
आपले सौंदर्य आणि तारुण्य बहुतेकदा काळ्या आणि जाड केसांशी संबंधित आहे.
काही नैसर्गिक पद्धती तुमचे पांढरे केस टाळण्यासाठी मदत करु शकतात. म्हणूनच,आज आम्ही तुम्हाला पाच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.
आवळा केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. आवळा पावडर आणि तेल तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे तुमचे केस काळे आणि मजबूत बनतील.
खोबरेल तेलात काही कढीपत्ता टाका आणि पानांचा रंग गडद हिरवा होईपर्यंत गरम करा. नंतर हे तेल थंड करुन केसांना आणि टाळूला लावा.
मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करुन पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावा आणि 30-45 मिनिटांनी धुवा.
रोज एक चमचा काळे तीळ खाल्ल्याने केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ, शांत लागेल झोप