Weather: पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस; 'या' जिल्ह्यांना IMD अलर्ट Saam Tv
महाराष्ट्र

Weather: पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस; 'या' जिल्ह्यांना IMD अलर्ट

हवामान विभागाकडून पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मागील राज्यातून मान्सून पुर्णपणे परतला आहे. मान्सून गायब झाल्यानंतर आता राज्यात किमान तापमानात काही प्रमाणात घट झालेली आहे. तर आता अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. परंतु हवामान विभागाकडून पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान विभागाकडून आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert for Vidrabha, middle Maharashtra) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देण्यात आलं आहे.

आज हवामान विभागाने गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि नाशिक अशा एकूण अठरा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाट होणार आहे. तर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे हवामान खात्याकडून या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यातून मान्सून माघारी गेल्यापासून, अनेक जिल्ह्यात किमान तापमानात minimum temperature घट झाली आहे. तर पहाटे हवामानात किंचीतसा गारवा जाणवू लागला आहे. आज महाबळेश्वरमध्ये 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सातारा मध्ये (18.7), नाशिक मध्ये (16.3), सोलापूरात (18.6) , औरंगाबादमध्ये (18.4) तापमान, तर पुण्यात (18.4) आणि बारामती (18.2) अंश सेल्सिअस किमान एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

Maharashtra Live News Update : हुंडा घेणारे नामर्द, अभिनेते मकरंद अनासपुरेंचं परखड मत

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

Silver Purchases: बनावट चांदीच्या बारची होतेय विक्री, खरेदी करताना कोणती सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या...VIDEO

Accident News : प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT