Vidarbha Marathwada Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Heavy Rain Alert : विदर्भ-मराठवाड्याला आज मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या जिल्ह्यात कोसळणार पाऊस? वाचा सविस्तर...

Vidarbha Marathwada Rain Alert : येत्या दोन दिवसांत वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

Satish Daud

देशातील हवामानात सध्या अनेक मोठे बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात सध्या पाऊस पडतोय. त्यातच येत्या दोन दिवसांत वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २३ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून आज रविवारपासून पुढील ३ दिवस जोरदार पावसाची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची चांगली काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

मराठवाडा-विदर्भात पावसाची शक्यता

हवामान खात्याने (Maharashtra Weather Update) आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात कोसळणार पाऊस

दुसरीकडे मुंबईसह उपनगरात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पाऊस पुनरागमन करेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT