Weather Forecast 19 February 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert: देशातील ७ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस अन् गारपीटीची शक्यता; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा...

Weather Update Today: पश्चिम हिमालयातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बहुतांश राज्यांचे हवामान बदलले आहे. परिणामी आजपासून पुढील ३ ते ४ दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

Weather Forecast 19 February 2024

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम हिमालयातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बहुतांश राज्यांचे हवामान बदलले आहे. परिणामी आजपासून पुढील ३ ते ४ दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज (Rain Alert) आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर मध्य प्रदेशातही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात गारपीट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीत १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या संपूर्ण आठवड्यात दिल्लीचे किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २४ ते २७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागातून थंडी गायब झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Param Sundari vs Baaghi 4 : 'परम सुंदरी' की 'बागी 4' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? टायगर श्रॉफच्या चित्रपटाने 5व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

SCROLL FOR NEXT