Ambadas Danve Receives Death Threat साम टीव्ही
महाराष्ट्र

मोठी बातमी! ठोकून काढू, कापून टाकू...ठाकरेंच्या दिग्गज शिलेदाराला धमक्यांचे फोन, थेट नंबरच सांगितला

Ambadas Danve Receives Death Threat छ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Ambadas Danve threat call News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन आले आहे. अंबादास दानवे यांनी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर आय़ुक्तांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रार करताना ज्या क्रमांकावरून फोन आला, तो नंबरही दिलाय. ठोकून काढू, कापून टाकू अशा धमक्या दानवेंना दिल्याचं पोलिसांच्या तक्रारीतून समोर आले आहे. दानवेंना धमकी आल्यानंतर संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.

जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे. ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च,१४ मार्च असे चार दिवस दानवे यांना लागोपाठ फोन आले. कापून टाकू असे म्हणत धमकी दिली. दानवे यांना ९५९५९५९३०३ या मोबाईल क्रमांकाहून फोन येत असल्याचं तक्रारीवरून समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून कसून तपास सुरू केला आहे. धमक्या का दिल्या? कुणी दिल्या? यामागे कुणाचा हात आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यत येत आहे.

१५ मार्च रोजी रात्री ०१. ५४ वाजता, ०१. ५५ वाजता आणि ०२.०० वाजता धमक्या व शिवीगाळ दिल्या जात असल्याचं पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तीन ते ४ लोकांनी फोन करून धमक्या दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. कापून टाकू, ठोकून टाकू अशा धमक्या फोनवरून दिल्या जात होत्या, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेमुळे माझ्या व कुटुंबियांच्या सुरक्षेस धोका संभवू शकतो. या घटनेची रीतसर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून केली आहे. अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आरोपींवर तात्काळ कारवाई कऱण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून कऱण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आक्रमक झाले होते. त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली थेट भूमिका मांडली होती. त्यामुळेच त्यांना धमकी आली का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor death case: डॉक्टर मैत्रिणीला भेटायला रात्री फ्लॅटवर गेला, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला; तरुण डॉक्टरचा मृत्यू, हातावरील एका खूणेने संशय वाढला

Maharashtra News Live Update: वाशिम मनसेची समृद्धी महामार्गावर आपात्कालीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारहाण

Crime news: बाबानं माझ्यावर बलात्कार केला...! मुलगी रस्त्यावर भीतीनं पळत सुटली, साधूवरील गंभीर आरोपांनी खळबळ

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

SCROLL FOR NEXT