Sanjay Shirsat Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : आम्ही मूर्ख आहोत का? बावनकुळेंच्या आकडेवारीवर आमदार संजय शिरसाट भडकले

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपावरून केलेल्या विधानामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटात जुंपली असल्याच चित्र दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांना एवढे अधिकार कोणी दिलेले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यात काहीच दम नाही, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपावरून केलेल्या विधानामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटात जुंपली असल्याच चित्र दिसत आहे.(Political News)

विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे ४८ जागा येतील, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. या विधानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. नंतर हा व्हिडिओ डिलेट करण्यात आला. त्यांच्या या विधानावरून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तसेच शिंदे गटातील नेत्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बावनकुळे यांचा हा फॉर्म्युला ऐकून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा मोठा संताप झाला.

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही काय मुर्ख आहोत का? बावनकुळे यांना हे अधिकार नेमके कोणी दिलेत? त्यांनी आपल्या मर्यादेत रहावं आणि तेवढंच बोलावं, अशा खरमरीत शब्दांत संजय शिरसाट यांनी बावनकुळेंवर निशाना साधला आहे.

वरिष्ठ नेत्यांना निर्णय देऊ द्या

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही. आम्ही फक्त ४८ जागा लढवण्यासाठी मुर्ख आहोत का? या सर्व गोष्टींची वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील. तुम्हाला किंवा मला यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT