Political News : मी तुमचेच व्हिडिओ तुम्हाला पाठवतो अन् ...; संजय राऊतांच्या वक्तव्यांवर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

सत्तेपासून पैसा आणि पैसे देऊन सत्ता एवढेच ते करत राहिले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam TV
Published On

Chandrashekhar Bawankule News: गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे असे पुरावे आहेत ज्याने तुमचे कुटुंब तुरूंगात जाईल, असा इशारा संजय राऊत देत आहेत. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. (CHANDRASHEKHAR BAWANKULE)

'मी संजय राऊत यांना आरसा दाखवतो. त्यांनी काय केले ते सांगा, अडीच वर्षे ते फेसबुक लाईव्ह करत राहिले. मी तुमचेच व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आणि एक आरसा पाठवतो. त्यांनी स्वतःचा चेहरा बघावा, सत्तेपासून पैसा आणि पैसे देऊन सत्ता एवढेच ते करत राहिले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Politics : संजय राऊत पूर्ण वेडा झालेला माणूस; गोपीचंद पडळकर यांची टीका

'संजय राऊत यांच्यावर खरंतर बोलूच नये, त्यांनी युती धर्म तोडला, त्याचं पाप उद्धव ठाकरे यांच्याच गटाने केलं, त्यांच्याकडे उमेदवार नव्हते काही ठिकाणी आम्हाला उमेदवार द्यावे लागले. 25 ठिकाणी यांचं तुम्ही उमेदवार द्या आणि आम्ही लढतो असं झालंय. संजय राऊत यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, उद्धव ठाकरे यांच्याकडचे काही आमदार हे नक्कीच एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : 'पापी औरंग्याला मी कशाला जी म्हणू?' चंद्रशेखर बावनकुळे यांची वक्तव्यानंतर सारवासारव

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, आमच्यावर झालेले आरोप खरे आणि तुमच्यावर झालेले आरोप खोटे असं काय? तुमचं कुटुंब तुरुंगात जाईल असे पुरावे आमच्याकडे आहेत. तुम्ही मला तोंड उघडायला लावू नका. तसं झालं तर महाराष्ट्रात स्फोट होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काल देखील त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com