Pandharpur water Shortage News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur water Shortage News : पंढरपुरात पावसाळ्यात पाणीटंचाई; गावांना टँकरने पाणीपुरवठा, पशुधनही धोक्यात

Water Crises News : सोलापूर जिल्ह्यात नागरिक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

भारत नागणे

Pandharpur News : मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे, शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात नागरिक अजूनही पावसाच्या (Rain News) प्रतीक्षेत आहेत.

पाऊस पुरेशा प्रमाणात नसल्याने सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील ९ गावांमध्ये ऐन पावसाळ्यात देखील टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाण्याअभावी चारा पिके जळून गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. (Maharashtra News)

पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनामध्ये मंगळवेढा तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्याची मागणी केली आहे. सांगोला तालुक्यातील कटपळ येथे ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणावत आहे. येथे दिवसभरात दोन टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येथे जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

चाऱ्याअभावी व पाण्याअभावी येथील पशूधन धोक्यात आले आहे. सध्याच्या राजकीय साठमारीमध्ये नेते व अधिकारी व्यस्त आहेत. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.  (Latest Marathi News)

पावसाने सोलापूर जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. येत्या आठ दिवसात मोठा पाऊस झाला नाही तर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला रामराम करणार? ती पोस्ट तुफान चर्चेत

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार?

Akola News : मविआमध्ये ठाकरे गटाचे बंडखोरीचे संकेत, अकोला पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी

Top 10 Airports: जगातील सर्वात दिमाखदार टॉप १० विमानतळे, वाचा कोण कोणत्या देशाच्या एअरपोर्टचा समावेश!

Aditya Thackeray Net Worth: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून धक्का बसेल

SCROLL FOR NEXT