Water Crisis Yandex
महाराष्ट्र

Water Shortage: छत्रपती संभाजीनगरवर पाणी कपातीचं संकट; हर्सूल तलावात फक्त महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरवर पाणी कपातीचे संकट असल्याचं दिसत आहे. हर्सूल तलावात फक्त ७ फूट पाणी शिल्लक राहिलं आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis News

दिवसेंदिवस ऊन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तितकीच पाणी टंचाईची समस्या (Water Crisis) देखील गंभीर होत चालली आहे. छत्रपती संभाजीनगरवर पाणी कपातीचे संकट असल्याचं दिसत आहे. हर्सूल तलावात फक्त ७ फूट पाणी शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये काय हाल होणार, असा प्रश्न सर्वांना पडत आहे.  (Latest Marathi News)

एप्रिल अखेरपर्यंतच पाणी पुरण्याची शक्यता असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढल्याने सगळीकडेच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली (Chhatrapati Sambhajinagar Water Crisis) आहे. उन्हाळ्यात जुन्या शहरातील १६ वॉर्डाची तहान भागविण्यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून हर्सूल तलावाजवळ नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं होतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता प्रत्यक्षात नागरिकांची तहान भागवण्याची वेळ आल्यावर हर्सूल तलावातील पाणी कमी झालं आहे. तलावातील (Hersul Lake) पाणी पातळी अवघ्या ७ फुटांवर येऊन ठेपली आहे. महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा तलावात आहे. त्यामुळे शहरात मे महिन्यात मनपासमोर गंभीर पेच निर्माण होणार आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर आता पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

तलावातून ज्या १६ वार्डांना पाणी पुरवल्या जाते, त्या वार्डांमध्ये पाणी कपातीचं संकट उभे राहिलं आहे. दरम्यान आता तलावातून दररोज १० एमएलडी पाण्याचा उपसा करून नागरिकांना पाणी देण्याची वेळ (Water Crisis News) आली. तेव्हा तलावात केवळ ७ फूट जलसाठा असल्याचं लक्षात आलं. परंतु, हा उपसा जर सुरूच राहिला तर एप्रिल महिन्यातच तलाव कोरडा पडेल, असा अंदाज आहे.

यावर्षा पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात पाण्याची टंचाई जाणवत ( Chhatrapati Sambhajinagar Water Issue) आहे. सगळ्या शहरांमध्ये पाणी कपातीचं संकट आहे. त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई समोर उभी ठाकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT