water scarcity in kumbhari village solapur saam tv
महाराष्ट्र

Water Shortage In Kumbhari : साेलापुरातील कुंभारी गावात दुष्काळजन्य परिस्थिती; 25 महसूल मंडलात पाणी टंचाई

Solapur Latest News : या गावात टॅंकरच्या माध्यमातून पाणी पूरवठा सुरु आहे. गावातील अबालवृद्ध पाण्याच्या टॅंकरभाेवती हंड्यांसह गराडा घालत असल्याचे चित्र आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur :

सोलापूर जिल्ह्यातील 25 महसूल मंडलात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील पाणी साठ्याची सद्यस्थिती पाहता उजनी धरणात वजा 37.09 टक्के, सात मध्यम प्रकल्पात 10.99 टक्के, 56 लघु प्रकल्पात 2.68 टक्के तर 90 कोल्हापूर बंधाऱ्यात 18.67 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोलापूर जिह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतून टँकरची मागणी वाढत आहे. सोलापूर जिह्यातील सहा तालुक्यांतील 34 गावात आता 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (Maharashtra News)

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जून पर्यंत पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावात टॅंकरच्या माध्यमातून पाणी पूरवठा सुरु आहे. गावातील अबालवृद्ध पाण्याच्या टॅंकरभाेवती हंड्यांसह गराडा घालत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT