jat villagers demands water from mhaisal project today  saam tv
महाराष्ट्र

Mhaisal Water Project : म्हैसाळच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे रक्तदान आंदाेलन, बालगावमध्ये रास्ता राेकाे

सन 2019 मध्ये शेजारील मंगळवेढा तालुक्यात पाणी गेले पण जत पूर्व भागातील पुर्णत 48 गावे अर्थत 17 गावे अशी 65 गावे आजही पाण्यापासुन वंचित आहेत.

विजय पाटील

Sangli News :

रक्त घ्या, पाणी द्या अशी मागणी घेऊन जत येथील दुष्काळग्रस्तांनी आज (गुरुवार) थेट रस्त्यावरच रक्तदान करीत पाण्यासाठी आंदोलन छेडले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे रास्ता रोको (rasta roko andolan in jat taluka) करत रक्तदान केले. (Maharashtra News)

जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे, ऐन हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्रत टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या, जनावरांचा आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत.

ग्रामस्थांनी तातडीने म्हैसाळ सिंचन योजनेतून गुड्डापूरसह इतर तलाव भरून द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी आज बालगाव येथे थेट रास्ता रोको आंदोलन केले. या ठिकाणी दुष्काळग्रस्तांनी रक्तदान करत रक्त घ्या,पाणी द्या अशी मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जत तालुक्यातील भाजपा नेत्यांसह पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी देखील सहभागी घेतला होता. तसेच पाण्याच्या प्रश्न न सोडवल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर 65 गावांकडून बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा यावेळी आंदाेलकांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT