rajaram bandhara, jagbudi river saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापूरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, खेडच्या जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

kolhapur breaking news : चंदगड मधील घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने आज भरला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली (rajaram bandhara flooded) गेला आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्यानंतर ही या भागात धोकादायक वाहतूक सुरू आहे. दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून राजाराम बंधारावरून प्रवास करत आहेत. (Maharashtra News)

कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजता 16.1 फुटांवर आली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून 43 फुटांवर धोका पातळी समजली जाते.

काेल्हापूर जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे (rain) राजाराम आणि शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच चंदगड मधील घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. हा प्रकल्प पहाटे 4 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

दरम्यान रत्नागिरीच्या (ratnagiri) खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीने (jagbudi river) आज (शुक्रवार) इशारा पातळी ओलांडली आहे. सकाळी ११ वाजता पाणीपातळी ६.७५ मीटर एवढी म्हणजेच धोका पातळीपेक्षा ०.२५ मी कमी नोंदवली गेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Shocking : प्रसिद्ध बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्या; 4 दिवसांवर होतं लेकीचं लग्न

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार कुणी केला? संशयितांची नावं आली समोर; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकं काय घडलं होतं? तपासातून सत्य येणार समोर

Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT