Hingoli DCC Bank News : हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा, तक्रार निवारण कक्ष स्थापन

या प्रकारानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संशयित कर्मचा-यांची चौकशी सुरू केली.
hingoli dcc bank
hingoli dcc bankSaam tv

Hingoli News : हिंगोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (hingoli dcc bank) आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. औंढा तालुक्यातील लाख गावातील बँकेच्या शाखेत हा घोटाळा झाला आहे. यामुळे अनेक खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेत तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून, खातेदारांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

hingoli dcc bank
Jalna Railway News: जालन्यात रेल्वे मार्गावर घातपाताचा कट, रूळावर ठेवला लोखंडी ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (dcc bank) कर्तव्यावर असलेल्या दाेन कर्मचाऱ्यांनी खातेदारांची चाळीस ते पन्नास लाख रुपयांची रक्कम परस्पर उचलल्याचे सांगितले जात आहे. या दाेघांवर संशयाची सूई असून याप्रकरणी 150 चिंतेत पडलेल्या खातेदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

hingoli dcc bank
Pawar vs Pawar: अजित पवारांच्या भूमिकेनंतर बारामतीच्या मुस्लिम युवकांची भावना तीव्र

या प्रकरणात धक्कादायक म्हणजे (hingoli) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पगाराच्या रकमा देखील गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली.

hingoli dcc bank
Latur News : 'मायबाप सरकार आमचा प्रश्न साेडवेल' निरागस मुलांना का करावं लागलं झेडपीच्या गेटवर आंदाेलन ?

पाेलिसांत जाणार

बँकेचा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्मचा-यांवर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेत तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून खातेदारांनी त्यांच्या तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com