Water Crisis In Maval दिलीप कांबळे
महाराष्ट्र

Water Crisis in Maval: ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण; गावात चार महिने नळाचे पाणी केले जाते बंद

Water Crisis In Maval: मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागाच्या दुर्गम भागातील असलेल्या थोरण आणि जांभवलीच्या ग्रामपंचायतीकडून पावसाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी मनाई करण्यात आली.

दिलीप कांबळे

मावळ: उन्हाळ्यात पाण्यासाठी गावागावांत महिलांची वणवण (Water Crisis) होत असल्याचं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. परंतु पावसाळ्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील महिलांना पाण्यासाठी कोसो लांब जावं लागत असल्याच चित्र सध्या मावळ तालुक्यात पाहायला मिळत आहे. पावसामुळे मावळ (Maval) तालुक्यात निसर्गाचे सौंदर्य खुलत असते. परंतु पाऊस असूनही गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. (Water Crisis In Maval)

हे देखील पाहा -

मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागाच्या दुर्गम भागातील असलेल्या थोरण आणि जांभवलीच्या ग्रामपंचायतीकडून पावसाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी सह्याद्रीच्या कडेकपारीत तसेच ओढ्यावर भटकंती करावी लागत आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

थोरण व जांभवली ही नाणे मावळ भागातील सर्वात शेवटची आणि दुर्गम भागातील गावे आहेत. या गावांमध्ये गेल्या १५ वर्षांपूर्वी नळ पाणीपुरवठा योजना बसविण्यात आली. ग्रामपंचायत टाटा धरणातून या गावांना पाणीपुरवठा करते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर येथे ग्रामपंचायत पाणीपुरवठा बंद करते. त्यामुळे महिलांना नैसर्गिक स्रोतांवर पाणी भरायला जावे लागते.

शेतीची कामे सोडून पाणी वाहण्यासाठी येथील नागरिकांना आणि महिलांना तासनतास वाया घालवावे लागतात. पावसाळ्यात या भागात ओला दुष्काळ निर्माण होत असताना हंडाभर पाण्यासाठी जीवाची ओढतोड करावी लागत आहे. महिलांप्रमाणे घरातील मुलींना देखील शाळा कॉलेज आणि अभ्यास सोडून पाणी भरण्यासाठी वेळ घालवावा लागतो. त्यामुळे शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हायचं की या पाण्यामुळे शिक्षण बाजूला ठेवायचे असा प्रश्न शालेय विद्यार्थिनींना पडला आहे.

पाण्यासाठी महिलाची होणारी वनवन ही केवळ लाइटची समस्या असल्यामुळे होता असल्याचे बीडीओ भागवत यांनी सांगितले. मात्र जलजीवन योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी आला असून पावसाळ्यानंतर काम सूरु करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मावळला निसर्गाने भरभरुन दिले आहे. त्यामुळे पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतो, मात्र अशा धो-धो पाऊस पडणाऱ्या मावळातील असे गावे आहे की पाण्यासाठी महिलांनी डोंगरावरच्या पाण्यावर उपजीविका करावी लागते. गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले आहे. या गावात चार महिने नळाचे पाणी बंद केले जाते. भारताने यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरा केल. मात्र या 75 वर्षात भारताने मोठी प्रगती केली. परंतु भारतात आजही अनेक ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची मात्र वानवा पहायला मिळत आहे ही खंत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT